Ad will apear here
Next
मीमांसा प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी प्राज आणि ‘आयआयएसईआर’चा करार
प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांच्यातील कराराप्रसंगी प्रमोद चौधरी आणि प्रा. जयंत उदगावकर

पुणे : गेल्या १२ वर्षांपासून ‘आयआयएसईआर’तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मीमांसा या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या विस्तारासाठी यंदा प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार  प्राज या स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांसाठी तांत्रिक, तसेच आर्थिक सहाय्य देईल. 

देशातील लोकप्रिय विज्ञान स्पर्धा म्हणून मीमांसा स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. दोन लाख रुपयांची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली असून, यंदा २२ शहरांमधील १७०० संस्था यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ जानेवारी २०२० रोजी होणार असून, जाईल आणि मार्च २०२० मध्ये ‘आयआयएसईआर’मध्ये अंतिम फेरी होईल. 

‘प्राजसारख्या उत्तम कंपनीने मीमांसाशी जोडले जाणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ‘प्राज’च्या पाठिंब्यामुळेच या स्पर्धेच्या उच्च गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल,’ असे मत प्रा. जयंत उदगावकर यांनी व्यक्त केले. 

प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी म्हणाले, ‘उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याचा फायदा उद्योग-व्यवसायांनाही होतो. या स्पर्धेमुळे नवीन संशोधनाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWFCG
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
सूर्यदत्ता ठरला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
नवले महाविद्यालयात संविधान दिन साजरा कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language